ठाणे पोलीस आयुक्तालयात स्फोटकं आणि अंमली पदार्थ शोधणा-या श्वानांची प्रात्यक्षिकं

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आयकॉनिक आणि फ्लॅगशीप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या फ्लॅगशीप कार्यक्रमांतर्गत पोलीस आयुक्तालय परिसरात आज सकाळी शिवाई मराठी विद्यालयात स्फोटके आणि अंमली पदार्थ शोधणा-या श्वानांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला २०० विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम श्वानांची माहिती आणि ते करत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. त्यानंतर श्वानहस्तक मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जॉली, ब्रुनो आणि बडी या श्वानांनी बॅगेतील, गाडीमध्ये लपवून ठेवलेली स्फोटकं शोधून काढली. सिंबाने अंमली पदार्थ शोधून काढले. सर्व श्वानांनी श्वान हस्तकांनी दिलेल्या कमांडप्रमाणे वेगवेगळी प्रात्यक्षिकं करून दाखवली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading