ठाणे महापालिका क्षेत्रात आज १४६ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद तर ९२ जणांना आज घरी सोडलं

ठाणे महापालिका क्षेत्रात आज १४६ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे. आता पालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २ हजार ७५० इतकी झाली आहे. एकूण ९२ जणांना आज घरी सोडण्यात आलं तर आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १ हजार १७७ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ४ रूग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण ७९ कोरोनाग्रस्त आत्तापर्यंत दगावले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्यांची संख्या १ हजार ४९४ इतकी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading