ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर

उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलीसांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलं जातं. यंदा राज्यामध्ये ८०० जणांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर झालं असून यामध्ये ठाण्यातील ९ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवा, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली कामगिरी, नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेली कामगिरी, पोलीस सेवेत सतत १५ वर्ष उत्तम सेवाभिलेख क्लिष्ट आणि थरारक गुन्ह्यांची उकल करून कोर्टात दावे दाखल करणं, विशेष शाखेतील कामगिरी, राष्ट्रीय स्तरावरील खेळातील प्राविण्य, पोलीसांची प्रतिमा उंचावणं, २० वर्ष विनाअपघात उत्तम सेवाभिलेख अशा विविध कामगिरींसाठी हे सन्मानचिन्ह दिलं जातं. ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेतील ९ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरिक्षक जयराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय घोसाळकर, पोलीस हवालदार एस आर जाधव, पोलीस हवालदार गणेश भोसले, पोलीस हवालदार संजय माळी, पोलीस हवालदार अंकुष भोसले, रविद्र पाटील आणि पोलीस नाईक नितीन ओवळेकर यांना ही सन्मानचिन्ह जाहीर झाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading