ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३१ नवीन कोरोनाबाधित रूग्ण – एकूण रूग्ण ३१०

ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३१ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यामुळे आता ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण रूग्णांची संख्या ३१० झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ९ रूग्ण वागळे इस्टेट प्रभाग समितीतील असून, काजूवाडी ६, कळवा, कोपरी आणि मुंब्रा प्रत्येकी २ तर रहेजा गार्डन, नागसेन नगर, लोकमान्यनगर, मुलुंड चेकनाका, साठेवाडी, खेवरा सर्कल, प्रेस्टीज रेसिडेन्सी, मानपाडा, राबोडी आणि दिवा येथे प्रत्येकी १ रूग्ण सापडला आहे. आज एकूण ५ जण बरे होऊन घरी गेले तर आज दोघा रूग्णांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading