कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी धार्मिक कार्यक्रम घरी राहूनच करण्याचं महापालिकेचं आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह इफ्तारीच्या अनुषंगाने एकत्र न येता घरी राहूनच रमजान साजरा करण्याचे आवाहन महापौर आणि पालिका आयुक्तांनी यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक तसेच क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबतची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जिदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्यस्थितीत लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये, घराच्या इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये, मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येऊ नये, कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण आदी धार्मिक कार्य पार पाडावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading