ठाणे परिवहन सेवेच्या बसमध्ये आग

आज संध्याकाळच्या सुमारास ठाणे परिवहन सेवेच्या एका बसमध्ये आग लागण्याची घटना घडली. लोकमान्यनगर बस डेपोमध्ये परिवहन सेवेची बस उभी असताना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बसमध्ये आग लागली. ही बस लोकमान्य नगर ते वृंदावन सोसायटी या मार्गाची होती. ही माहिती समजताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading