आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. गणेश भक्तांनी आज अंगारकीनिमित्त गणेश दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र गणेश मंदिरांमधून दिसत होतं. ठाण्यातील मयुरेश्वर, उपवन येथील भक्तकल्याण मंदिर, चरईतील गणेश मंदिर अशा ठिकठिकाणी भाविकांनी गणेशाच्या दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसत होतं. या आधी १३ सप्टेंबरला अंगारकी चतुर्थी आली होती. आजची ही या वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी आहे.