ठाण्यामध्ये सूर्यग्रहणाचा आनंद लुटण्यासाठी खगोलप्रेमींनी केली एकच गर्दी

ठाण्यामध्ये आज विविध ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यासाठी अबालवृध्दांनी एकच गर्दी केली होती. डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे आज गोदूताई परूळेकर मैदानात दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी ग्रहणविषयी माहिती दिली. ग्रहण पाहण्यासाठी सोलर चष्मेही यावेळी उपलब्ध करून देण्यात आले होते. ग्रहणावर ढगाळ वातावरणाचं सावट होतं. मात्र ठाण्यातून बहुतांश वेळ सूर्यग्रहणाचं उत्तम दर्शन झालं. सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी ग्रहण स्पर्श झाला. तर १० वाजून ५५ मिनिटांनी मोक्ष झाला. म्हणजे जवळपास २ तास ५१ मिनिटं खगोलप्रेमींना ग्रहणाचा आनंद लुटता आला. ठाण्याच्या विविध भागात नागरिकांनी रस्त्यावर येऊन ग्रहणाचा आनंद लुटला. सरस्वती मराठी शाळेतही ग्रहण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी शाळेतील छोट्या आणि मोठ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात ग्रहणाचा आनंद लुटला. छोट्या शिशु पासूनच्या विद्यार्थ्यांनी सूर्यचष्मा लावून ग्रहणाचा आनंद लुटला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading