ठाण्यात आज दुपारच्या सुमारास पावसानं वीजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. नंतर दुपारच्या सुमारास पाऊस पडायला सुरूवात झाली. दुपारी १ वाजल्यानंतर पावसानं जोरदार पडण्यास सुरूवात केली ते रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता.