ठाणे नगर वाचन मंदिरात मराठी भाषादिन आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलेले मराठी कवी कुसुमाग्रज, वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ठाणे नगर वाचन मंदिर, ठाणे व सुमन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय शास्त्रीय संगीत गायिका व पार्श्वगायिका श्रुती बुजरबरूवा यांच्या भावगीतांचा कार्यक्रम संस्थेच्या वा. आ. रेगे. सभागृहातआयोजित करण्यात आला होता. श्रुती यांनी सादर केलेल्या गीतांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली, यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
याच वेळी ठाणे नगर वाचन मंदिरातर्फे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
तसेच ८ मार्च या दिवशी होणाऱ्या जागतिक महिला दिना निमित्त ठाणे नगर वाचन मंदिरातर्फे, शास्त्रीय संगीत गायिका श्रुती बुजरबरुवा, म्यूरल आर्टिस्ट दिशा काटकर तसेच निबंध परीक्षक स्वाती बापट यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित सर्व महिला सभासदांचा पूष्प देउन सन्मान करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रम संस्थेचे माननीय अध्यक्षॲड. केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, कार्यवाह व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading