ठाणे जिल्हा आपत्ती प्राधिकरण मार्फत तंबू Tent उभारण्याचे प्रशिक्षण

जिल्हा आपत्ती प्राधिकरण मार्फत आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्राथमिक स्वरूपात निवाऱ्याची सोय करीत असताना, Air Inflatable Tent तंबूची उभारणी Air Compressors च्या साह्याने १०-मिनिटामध्ये कशाप्रकारे करायची याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदरचा Air Inflatable Tent हा ५०० स्क्वेअर फुटचा असून, आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुमारे १००लोक बसण्याची क्षमता असलेला हा तंबू आहे. सदरचा तंबू मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबिर, भूस्खलन (Landslide), इमारत कोसळणे (Building Collapse) या सारख्या विविध आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये वापरण्यात येतो.

सदर प्रशिक्षणाकरिता पुढीलप्रमाणे:-
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उप-जिल्हाधिकारी,
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (ठा.म.पा.),
ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,
पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,
ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान उपस्थित होते.

सदरचे प्रशिक्षण लाईफ लाईन सिक्युरिटी अँड सिस्टम (Life Line Sequrity & System) या कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading