ठाणे ते दिवा उन्नत रेल्वे मार्गावरील तुळई बसवण्याचं काम पूर्ण

ठाणे ते दिवा उन्नत रेल्वे मार्गावरील तुळई बसवण्याचं काम काल पूर्ण झालं आहे. ही तुळई बसवण्यासाठी मुंब्रा बाह्यवळण मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. साडेतीनशे टन वजनाची आणि ८० मीटर लांबीची ही लोखंडी तुळई बसवण्याचं काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं २१ तासात पूर्ण केले. ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सध्या जोरात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुंब्रा रेतीबंदर रस्त्यावरून जाणा-या उन्नत रेल्वे मार्गावर ही तुळई टाकण्यात आली. ठाणे वाहतूक शाखेनं केलेल्या नियोजनामुळे शहरात वाहतुकीची कोंडी टळली. आता आणखी एक तुळई बसवण्याचं काम २१ मार्चला हाती घेतलं जाणार असून त्यावेळी हा मार्ग बंद ठेवला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading