मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आता खूनाचा गुन्हा दाखल

सुप्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवलेल्या गाडीचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आता खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. मात्र हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी ते आत्महत्या करणं शक्यच नाही असं सांगून खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मनसुख हिरेन यांचं प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आल्यानंतर काल दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिका-यांनी हिरेन यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाची पाहणी केली होती. तसंच त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या पत्नीनं हिरेन यांच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला होता. विमला यांच्या तक्रारीनंतर खून आणि खूनाचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading