ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार पॅनलच्या विरोधात एकही अर्ज न आल्यामुळे राजेंद्र पाटील यांच्या गळ्यात पुन्हा एकदा अध्यक्षपदाची माळ पडली आहे. बँकेच्या सत्ताधारी संचालकांनी सहकार पॅनल तयार केले होते. प्रतिस्पर्धी महाविकास परिवर्तन पॅनल तयार करूनही पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. सहा संचालकांची आधीच बिनविरोध निवड झाली असून केवळ १५ संचालकांसाठी ही निवडणूक पार पडली होती. यात सत्ताधारी सहकार पॅनलकडे १८ संचालक आहेत. उर्वरित तीन संचालक राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक संचालक निवडून आले. पण बँकेवर सहकार पॅनलचे सर्वाधिक बहुजन विकास आघाडी, भारतीय जनता पक्ष आणि अन्य दोन मित्रपक्षांचे संचालक आहेत. त्यामुळे या पॅनलकडून आधीपासून बँकेच्या सत्तेवर दावा केला होता. आता पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीने बँकेवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading