ठाणे कल्याण लोकसभा शिवसेना तर भिवंडी भारतीय जनता पक्षच लढवणार – नरेश म्हस्के

ठाणे कल्याण लोकसभा शिवसेना तर भिवंडी भारतीय जनता पक्षच लढवणार असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. कल्याण लोकसभा मतसंघाबाबत स्थानिक भाजपाने घेतलेल्या भुमिके विषयी बंद खोली आड चर्चा होणे गरजेचे असल्याचं मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं. विनयभंग प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याशी आमचा काहीही संबंध नाही तर शिवसेनेच्या लोकसभा विधानसभा निहाय बैठका होणार असून लोकसभा आणि विधानसभा निहाय निरीक्षक नेमले जात आहेत. येत्या १३ जूनला शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठका होणार आहे. ठाणे, कल्याण लोकसभा शिवसेना लढवणार आणि भिवंडी भाजपाच लढणार असून तिन्ही जागा रेकॅार्ड ब्रेक मतांनी निवडून आणू असा विश्वास म्हस्के यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून आणण्यावर आमचा जास्त भर असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading