छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ७५ वर्ष जुन्या अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ७५ वर्ष जुन्या अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा मारला. कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ७५ वर्ष जुनी असलेली भगवान मेन्शन ही इमारत अतिधोकादायक झाली होती. १९५० साली बांधण्यात आलेली ही इमारत या परिसरातील सर्वात जुनी तीन माळ्याची इमारत होती. पालिकेने ही इमारत अतिधोकादायक असल्याचे जाहीर करत नोटीस इमारत निष्कासित करण्याची कार्यवाही सुरु केली. मुख्य चौकात रहादरीच्या रस्त्यालगत असलेली इमारत पाडण्यासाठी अनेक अडचणी होत्या.मात्र अखेर आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोहम्मद अली चौकाकडे जाणारी एकेरी वाहतूक बंद करत केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांच्या नेतृत्वात पोकलेन,जेसीबी,ब्रेकर च्या साहाय्याने कर्मचाऱ्याच्या मदतीने ही इमारत निष्कासित करण्यास सुरवात केली आहे. यावेळी बघ्यानी एकच गर्दी केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading