ठाणे गुन्हे शाखेने ग्वाल्हेरच्या भामट्याला सांगलीतुन केली अटक

मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर पोलीस शोध घेत असलेल्या फरार आरोपीस ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील कामेरी येथून अटक केली. नितीन पाटील उर्फ नितीन बारपटे असे आरोपीचे नाव असुन त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
ग्वाल्हेर गुन्हे शाखेकडून नितीन बारपटे विरोधात 2019 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हा आरोपी फरार होता. हा फरार आरोपी नवी मुंबईतल्या नेरुळ येथे राहण्यास होता. त्यामुळे गवाल्हेर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी ठाणे पोलिसांकडून लेखी पत्र देऊन मदत मागितली होती. त्यानुसार हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखा युनिट एककडे पुढील तपास कामी सोपवण्यात आले होते. दरम्यान नितीन हा सांगली जिल्ह्यातील त्याच्या मूळगावी आल्याची माहिती पोलीस नाईक अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी त्याला कामेरी, सांगली येथून अटक केली. आज या आरोपीस ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यास 5 ऑक्टोबरपर्यन्त न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अटकेतल्या आरोपीस पुढील तपासासाठी गवाल्हेर पोलिसांच्या ताब्यात देण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading