ठाणे कारागृहातील २५ कैदी कोरोनाबाधित

ठाणे कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाला असून सध्या कारागृहातील २५ कैदी कोरोना बाधित आहेत. कालच्या एका दिवसात ५ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना भाईंदर येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं आहे. कारागृहात सध्या ३ हजार ८५१ कैदी असून त्यांची नियमित तपासणी केली जात असल्याचं कारागृह अधिक्षकांनी सांगितलं. गेल्या वर्षभरात ५८ कैदी कोरोना बाधित झाले होते. तर कारागृहातील काही कर्मचा-यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असून काहींवर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading