ठाणे महापालिका क्षेत्रातील काल संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार कालच्या दिवसात ११ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७ रूग्ण किसननगर वागळे इस्टेट मधील आहेत तर मानपाडा, टेंभीनाका, चेंदणी कोळीवाडा, लोकमान्यनगर या परिसरातील प्रत्येकी एक रूग्ण दाखल झाला आहे. त्यामुळे आता महापालिका क्षेत्रात एकूण २०९ रूग्ण झाले आहेत. एकूण रूग्णांची संख्या प्रभागानुसार अशी आहे. माजिवडा मानपाडा प्रभाग समिती २१, वर्तकनगर १९, लोकमान्य-सावरकरनगर २७, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती २२, उथळसर ३०, वागळे १९, कळवा २७, मुंब्रा ४० तर दिवा प्रभाग समितीत आत्तापर्यंत एकूण ४ रूग्ण सापडले आहेत.