ठाणेकरांना आता हवामानाच्या सद्यस्थितीची माहिती मोबाईल आणि संकेतस्थळावर मिळणार आहे. गुगल प्लेवर पोल्यूशन कंट्रोल सेल ॲप असं नाव टाकल्यावर हे ॲप उपलब्ध होणार आहे. या ॲपमुळे ठाणेकरांना महापालिका क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती, हवामानाची सद्यस्थिती, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, हवेचा वेग तसंच प्रदूषण नियंत्रणाकरिता अवलंबवायची कार्यपध्दती याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन आणि पीसीसी टीएमसी डॉट कॉम स्लॅश वेदर या संकेतस्थळावरही ठाणे खाडीच्या भरती ओहोटी तसंच पर्जन्यमानाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेतर्फे हवेचं नियमित सर्वेक्षण केलं जात आहे.