ठाकरे गटाच्या मारहाण झालेल्या महिलेची उध्दव ठाकरेंकडून विचारपूस

ठाण्यात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या महिलेला मारहाण करण्यात आली. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन रोशनी शिंदेची भेट घेत तिची विचारपूस केली. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आहेत. काल कामावरून घरी जात असताना रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचं चित्रीकरणही सीसीटीव्ही कॅमे-यावर कैद झालं आहे. या घटनेची माहिती कळताच ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे पदाधिका-यांसह कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. पण त्यावेळी मात्र मारहाणीचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. रोशनी शिंदे यांना रात्री उशिरा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना एका खाजगी रूग्णालयात हलवण्यात आलं. त्या गर्भवती असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी त्यांच्या सर्व तपासण्या या नॉर्मल असून त्यांची गर्भचाचणी निगेटिव्ह असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading