जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेत ठाण्यातील विहान गावंडला विजेतेपद

जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेत ठाण्यातील पिनॅकल क्लबच्या विहान गावंड याने १५ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत कुश पाटील याचा ३ –० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. तर पिनॅकलच्याच प्रिशा मलिक हिने ११ वर्षाखालील मुलींच्या गटात अनिका नेने हिला ३ –० असं पराभूत करून बाजी मारली. तसेच पिनॅकल क्लबची बानी दुबे १५ वर्षाखालील मुली, ज्ञानश्री तरडे ११ आणि १३ वर्षाखालील मुली, देवश्री तरडे महिला गट, विहान हळदणकर १३ वर्षाखालील मुले तर सुबोध खांडेकर याने पुरूष गटाची उपांत्य फेरी गाठली. ठाणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने कल्याण महिला मंडळाने आयोजित चौथी ठाणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा २ ते ५ ऑगस्ट दरम्यान कल्याण येथे पार पडली. पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय खेळाडू स्वप्नील नामजोशी यांच्या हस्ते पार पडला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading