टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि जिल्हाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग आणि क्रीडा विभाग, ठाणे महानगरपालिका यांच्यावतीने महाराष्ट्रातून ‘’टोकियो ऑलिम्पिक २०२०’’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर नरेश गणपत म्हस्के आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातून तेजस्विनी सावंत (५० मी. रायफल शुटिंग), राही सरनोबत (पिस्तूल शूटिंग २५ मी.), प्रवीण जाधव ( आर्चरी रिव्हर्स ), चिराग शेट्टी (बॅडमिंटन पुरुष दुहेरी ), स्वरूप उन्हाळकर(पॅरा शूटिंग- १० मी.रायफल), अविनाश साबळे (अँथलेटिक्स-३००० मी स्टीपलचेस), सुयश जाधव ( पॅरा स्विमिंग) उदयन माने ( गोल्फ ), भाग्यश्री जाधव ( पॅरा अँथलेटिक्स- गोळा फेक) आणि विष्णू सरवानन ( सेलिंग लेसर सॅन्डर्ड क्लास) हे १० खेळाडू सहभागी होत आहेत. या सर्व खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग आणि क्रीडा विभाग ठाणे महानगरपालिका यांच्यावतीने जिल्हा नियोजन भवन आणि दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे ‘सह्यांची मोहीम” आणि ”सेल्फी पॉईंट” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत महाराष्ट्रातील १० खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्त्व करणार असून या जागतिक स्पर्धेसाठी यांची निवड होणे हि अभिमानाची गोष्ट असून या सर्वच स्पर्धकांनी सुवर्ण पदक प्राप्त करावे या सर्व ठाणेकरांच्या वतीने त्यांना सदिच्छा तसेच भविष्यात ठाण्यातील खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात होवून त्यांनी यामध्ये यश मिळवावे अशी इच्छा महापौरांनी व्यक्त केली. तसेच टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये देखील आपला सराव सुरूच ठेवला असून या सर्व खेळाडूंच्या पाठीशी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या शुभेच्छा असून या स्पर्धेत त्यांनी सुयश प्राप्त करण्याच्या सदिच्छा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या. ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील खेळाडू आणि पुरुष आणि महिला कबड्डीपट्टू यांच्यासाठी विशेष लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी १८ वर्षावरील महापालिकेच्या सर्व खेळाडूंचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading