टेलीमेडिसिन अंतर्गत मिळणार तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे उपचार करण्याची सुविधा

ठाणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना टेलीमेडिसिन अंतर्गत मिळणार तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे उपचार करण्याची सुविधा सुरू झाली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ही ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्ले स्टोअर वरून MedOnGo smart health
हे आप्लिकेशन डाउनलोड करून घरबसल्या कोरोनाची संभाव्यता तपासता येणार आहे. सोबतच थेट व्हिडिओ कॉल करून नागरिक यादीमधील उपलब्ध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेऊ शकतात. या उपक्रमामुळे रुग्णांबरोबरच डॉक्टरांचे आरोग्य देखील सुरक्षित राहण्यास मदत होणार असून ही सेवा मोफत आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading