झाड पडून तीन गाड्यांचं नुकसान

गेले काही दिवस झाडं पडण्याचं पेव फुटलं आहे. रोज ठाण्यामध्ये कुठे ना कुठे झाडं पडून जिवित अथवा वित्तहानी होत असल्याचं दिसत आहे. काल वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक २१ वरील निस्सान सर्व्हीस येथे तीन गाड्यांवर झाड पडून या गाड्यांचं नुकसान झालं. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं पडलेलं झाड कापून बाजूला केलं. मात्र एक निस्सान मॅग्नेट कार, एक निस्सान टेरेनो कार आणि निस्सान टर्बो कार यांचं यामध्ये नुकसान झालं आहे. निस्सान मॅग्नेट आणि निस्सान टेरेनो या दोन गाड्या सर्व्हीसिंग साठी आल्या होत्या. तर निस्सान टर्बो कार ही कंपनीची गाडी होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading