ज्युपिटर हॉस्पिटल समोर आज पहाटेच्या सुमारास एसटी बसच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि एसटी वाहकाला दुखापत

ज्युपिटर हॉस्पिटल समोर आज पहाटेच्या सुमारास एसटी बसच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि एसटी वाहकाला दुखापत झाली आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास बोरिवलीला जाणा-या एसटी बसने समोरून जात असलेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या बसमधून ४ महिला आणि ५ पुरूष प्रवास करत होते. यावेळी बसचा वाहक आणि एका महिलेला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading