कल्याण वरून नाशिक जिवंत काडतुस आणि चाकू घेऊन जाणाऱ्या आरोपीला कल्याण जीआरपी आणि आरपीएफने कसारा स्टेशन वरून बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नील गोसावी असे या आरोपीचे नाव असून याच्या वर दरोडा , घरफोडी, रॉबरी , जबरी चोरी सारखे अनेक गुन्हे दाखल असून हे जिवंत कडतुस कशा साठी घेऊन जात होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.