आम्हाला कोणतंही पद नको आम्ही शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत – जितेंद्र आव्हाड

आम्हाला कोणतंही पद नको आम्ही शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत. पण तुम्ही परत या असं भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी आज केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवल्यामध्ये जाणार होते. त्यावेळी ते निघाले असताना त्यांचं ठाण्यात स्वागत करण्यात आलं त्यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. आपण येवल्याला जाऊन शपथ घेणार आहोत, आपण सर्वांनी परत यावं, आपण आयुष्यात कधीही तुम्हांला त्रास देणार नाही. दुर कुठे तरी निघून जाऊ, आपल्या सत्ता, पैसा कसलाही मोह नाही, राजकारणही करायचं नाही. कोणतंही पद नको, शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत. फक्त सर्वांनी परत या आणि आपल्या बाजुला बसा असं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading