जोशी बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन सोहळा

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन सोहळा संपन्न झाला. मराठी भाषा विभाग आणि जन संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे निकष पाळत ऑनलाईन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे वाचन केले. ‘मराठी भाषा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर युवराज ताम्हनकर यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. विविध दाखले देऊन मराठी भाषा शुद्धीसाठी सावरकरांनी जे अथक प्रयत्न केले त्याबद्दल विस्तृत स्वरूपात माहिती दिली. भाषाशुद्धीच्या चळवळीचा उल्लेख करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेल्या इंग्रजी साठीच्या पर्यायी शब्दांचे योगदान नमूद केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली. यामध्ये मयुरी राणे- प्रेम कर भिल्लासारखं ,सार्थकी रांजणे- सागर, शितल शिंदे – वादळवेडी, ऋता वाळुंजकर – कणा, साक्षी देवधर- पिंजरा, समिधा पाटील -मराठी मातीचा टिळा, प्राजक्ता तांबे- चार होत्या पक्षिणी, साक्षी हिले- जालियनवाला बाग, ओवी लेले – नदी, वैष्णवी देशमुख – पाचोळा, करिश्मा तटकरे- श्रावण आला, श्रीपाद वैद्य – कोलंबसाचे गर्वगीत, रुपाली मिश्रा -दूरस्थ कोणी, अंकिता झोडगे -जगणे सुंदर आहे,अंकिता जाधव -केव्हातरीच पहाटे,चैताली दातार -जाग,अनन्या कशेळीकर-स्वातंत्र्य देवतेची विनवणी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कविसंमेलनाचे शैलीदार सूत्रसंचालन श्रीपाद वैद्य या विद्यार्थ्यांने केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading