ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात कल्याणच्या शिवशंकर क्रिडा मंडळाने तर किशोरी गटात राजश्री शाहु महाराज संघाने मारली बाजी

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात कल्याणच्या शिवशंकर क्रिडा मंडळाने तर किशोरी गटात राजश्री शाहु महाराज संघाने बाजी मारली. कुमार गटात श्री विठठल क्रिडामंडळ तर कुमारी गटात रा.फ.नाईक संघ अजिंक्य ठरला. कोपरीतील स्वर्गीय रमेश देवाडीकर क्रीडा संकुलात २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत चार गटात ही स्पर्धा खेळवण्यात आली. या कबड्डी स्पर्धेत चार गटांमध्ये ११९ संघ सहभागी झाले होते. किशोर गटातील अंतिम लढतीत कल्याणच्या शिवशंकर क्रिडा मंडळाने नवी मुंबईच्या रा.फ. नाईक संघावर मात करून विजेतेपद पटकावले. नाईक संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या गटात उपउपांत्य फेरीत संघर्ष क्रिडा मंडळ, मोहने आणि नवरत्न क्रिडा मंडळ विजेते ठरले. किशोरी गटात रबाळेचा राजश्री शाहु महाराज अंतिम विजयी तर, ठाण्याचे स्फूर्ती क्रिडा मंडळ उपविजेते आणि उपउपांत्य फेरीचे विजेतेपद जयभारत स्पोर्टस क्लब आणि कल्याणच्या ज्ञानशक्ती युवा संस्थेने पटकावले. कुमार गटातील अटीतटीच्या लढतीत ठाण्याचे श्री विठ्ठल क्रिडा मंडळ अंजिंक्य तर, कल्याणचा ओम कबड्डी संघ उपविजेता ठरला. उपउपांत्य फेरीत कल्याणच्या शिवशंकरने आणि नवी मुंबई क्रिडा प्रबोधिनीने बाजी मारली. कुमारी गटात नवी मुंबईच्या रा.फ.नाईक संघाने विजेतेपदावर नाव कोरले. तर, ज्ञानशक्ती युवा संस्था,कल्याण या संघाला उपविजेतेपद मिळाले.उपउपांत्य फेरीत कल्याणचे श्री समर्थ क्रिडा मंडळ आणि रबाळे येथील राजश्री शाहू महाराज विजयी झाले. सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading