जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे p

जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे एकुण 81 मुले शिक्षण घेत असून, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात तयार केली आहे. शिक्षक अमोल पेन्सलवार यांनी पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन परसबागेतील प्रत्येक झाडाला QR कोड दिला आहे. तो. QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रत्येक झाड स्वतः बोलू लागते, म्हणजेच ते झाड स्वतःचे नाव, उपयोग, गुणधर्म, पोषणमूल्य इत्यादी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देते. या परसबागेत अळूची पाने, काकडी, भोपळा, दोडकी, कारली, डोंगर, चवळी, कडीपत्ता, तोंडली ,औषधी वनस्पती, अडुळसा, तुळस, कोरफड, पानफुटी यांचेही झाडे लावली आहेत. ही सर्व परसबाग शाळेच्या आवारातच तयार होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक वाढते. विद्यार्थी निसर्ग आणि पर्यावरणाशी एकरूप होतात तसेच परसबागेतील तयार होणार्‍या शाळेतील भाज्या यांचा मुलांच्या दैनंदिन पोषण आहारात समावेश केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुपोषण दूर होऊन विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळण्यासाठी मदत होत आहे. विशेष म्हणजे ही सर्व परसबाग कुठल्याही रासायनिक औषधांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने तयार केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचे ही महत्त्व कळते. या उपक्रमाचे जिल्हा परिषद ठाणे चे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, उपशिक्षणाधिकारी ज्ञानदेव निपुर्ते, यांनी कौतुक केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading