जिल्ह्यामध्ये असलेल्या तीन लोकसभा मतदारसंघातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद

जिल्ह्यामध्ये असलेल्या तीन लोकसभा मतदारसंघातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५३.०७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम आणि मुरबाड हे विधानसभेचे ६ मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वाधिक म्हणजे ६५.६२ टक्के तर सर्वात कमी म्हणजे ४३.०७ टक्के मतदान कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात झालं आहे. शहापूरमध्ये ५९.८५, भिवंडी पश्चिम ५०.८१, भिवंडी पूर्व ४६.९३ तर मुरबाड विधानसभा मतदारसंघात ५६.६४ टक्के मतदान झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading