जिल्ह्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये ११ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायाधीश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष एन.के ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेदहा वाजता ही राष्ट्रीय लोक अदालत होईल.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला सर्व पक्षकारांनी अर्ज करावा असे आवाहनही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी २५४७६४४१ यावर संपर्क साधावा. राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, १३८ एन. आय.अॅक्ट (चेक संबंधिची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज आणि पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading