जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधील हजारो प्रवाशांची सतरा तासांच्या प्रयत्नानंतर सुटका करण्यात यश

जिल्ह्यांमध्ये काल आलेल्या जोरदार पावसाने हाहाकार उडवून दिला. मुंबईहून कोल्हापूर ला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी येथे अडकल्याने हजारो प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. काल झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीला पूर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पाण्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी जवळ अडकली होती. या महालक्ष्मी एक्सप्रेस मधील सुमारे दीड हजाराहून प्रवासही गाडीत अडकून पडले होते. जवळपास सतरा तासानंतर या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात यश आलं. महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी येथे अडकून पडल्याचे लक्षात येताच सर्वप्रथम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पटकन धाव घेतली. महापालिकेच्या टीडीआरएफच्या पत्कान वांगणी येथे धाव घेऊन प्रवाशां ची सुटका करण्याचा प्रयत्न सुरु केला. नंतर त्यांच्या मदतीला एनडीआरएफची टीम आली.नौद्लाचीही टीम मदतीला आली. या तिन्ही पथकांनी मिळून दुपारपर्यंत जवळपास एक हजाराहून अधिक प्रवाशांची सुटका केली. सुरुवातीला महिला आणि बालकांना प्राधान्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. वांगणी जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस अशा ठिकाणी अडकली होती की त्या ठिकाणी जाण्याचा मार्गही खडतर होता, त्यामुळे मदत कार्य पोहोचण्यास उशीर झाला. यामुळे प्रवाशांचेही चांगले झाले, प्रवाशांना खायला-प्यायला काही नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले होते. त्यामध्ये लहान मुलं बाळं यांचे अधिक हाल झाले. एकाच जागी बसून राहिल्यामुळे लहान मुलांनी ही त्यांच्या पालकांना हैराण केलं होतं. गाडीतील प्रवासी बचतीसाठी मदतीचा धावा करत होते. स्थानिक नागरिक,एनडीआरएफ, नौदल, टीडीआरएफच्या पथकांनी प्रवाशांची मेहनत घेऊन सुटका केली. या सर्व प्रवाशांना 14 बस आणि टेम्पो सुरक्षित हलवण्यात आलं. या प्रवाशांमध्ये 9 गर्भवती महिला ही होत्या. महालक्ष्मी एक्सप्रेस मधील सर्व प्रवाशांची सुटका दुपारी तीनच्या सुमारास करण्यात यष आल. आता या सर्व प्रवाशांना बदलापूरला नेऊन मनमाड मार्गे कोल्हापूर ला पाठवल जाणार आहे, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading