महावितरण अंतर्गत येणाऱ्या दिवा परिसरातील मुब्रादेवी कॉलनीत अनधिकृत वीज वापरणाऱ्या धडक कारवाई

महावितरण अंतर्गत येणाऱ्या दिवा परिसरातील मुब्रादेवी कॉलनीत अनधिकृत वीज वापरणाऱ्या धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये दिवा मुंब्रादेवी परिसरातील विविध नऊ इमारती मधील ३३६ ग्राहकांचा अनधिकृत वीज पुरवठा खंडित करण्यात आला. गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या इमारतीच्या भरत पाटील आणि राकेश पाटील या बिल्डरांवर मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली. दिवा परिसरात वांरवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला असता विविध इमारतींत अनधिकृत वीज पुरवठा घेतला गेल्याचे लक्षात आले. यामुळे ट्रान्सफॉर्मर वर विजेचा भार वाढल्याने प्रामाणिक ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. यामध्ये गुरुवारी एका इमारतीवर तर शुक्रवारी आठ इमारतींवर कारवाई करत या इमारतींमधील ३३६ फ्लॅट/गाळ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये मनस्विनी इमारतीत ३०, जगन्नाथ धाम इमारतीत ६३ , क्रिश प्लाझा इमारतीत ३२, शंकर निवास इमारतीत ५७, मोरेश्वर गॅलेक्सी इमारतीत ३१, यशरुद्र १९, अर्जुन रेसिडेन्सी इमारतीत ७० आणि साई सावली इमारतीत दोन अनिधकृत कनेक्शन आढळून आले. तर गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या जगन्नाथ धाम ई एफ इमारतीतील ३२ फ्लॅट/गाळे धारकांचा पुरवठा खंडित करून बिल्डरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही ग्राहकांनी नवीन जोडणी करता फक्त अर्ज केला असून त्यांच्या वीज जोडणी बाबत करवाई करण्यात येत आहे. या अनधिकृत जोडण्यांमुळे महावितरणच्या कोट्यवधी रुपयांचा महासुलवर परिणाम होतो.विज चोरी यापुढे कोणत्याची पद्धतीत खपवून घेतली जाणार नाही.” असा स्पष्ट इशारा सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading