सर्वात लहान शास्त्रज्ञ आणि सध्या नासामध्ये काम करीत असलेल्या ठाणेकर अक्षत मोहिते यांनी घेतली संजीव जयस्वाल यांची सदिच्छा भेट

आशिया खंडातील सर्वात लहान शास्त्रज्ञ म्हणून गौरविले गेलेल्या आणि सध्या नासामध्ये काम करीत असलेल्या ठाणेकर अक्षत मोहिते यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची सदिच्छा भेट घेतली. नासामध्ये संशोधन करीत असलेला हा शास्त्रज्ञ ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे कौतुकाद्गार काढून अक्षत मोहितेच्या पुढील वाटचालीसाठी आयुक्तांनी त्याला शुभेच्छा दिल्या.
दुसरीपासूनच मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे असे स्वप्न बाळगणारा अक्षत मोहिते नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे. ठाण्यातील आर्या केंब्रिज स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले असून आठवीपासून त्याने अनेक शास्त्रज्ञांची पुस्तके वाचावयास सुरूवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी अक्षतने 20 हजार लोक एकावेळी राहू शकतील या विषयावर ’स्पेस सेटलमेंट’ हा रिसर्च पेपर तयार केला आणि हा पेपर नासा एम्स रिसर्च येथे पाठविण्यात आला होता. त्याच्या या पेपरचे सादरीकरण त्याने इंटरनॉशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स येथे शास्त्रज्ञांसमोर झाले आणि त्याचे हे पहिले संशोधन निवडले गेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या अक्षत मोहिते हा नासामध्ये सर्वात लहान शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे. सन 2032 मध्ये मंगळग्रहावर लोकांना पाठविण्यात येणार असून या संशोधनामध्ये अक्षतची निवड करण्यात आली आहे. या संशोधनामध्ये त्याचा महत्वपूर्ण सहभाग असून सध्या तो या संशोधनामध्ये व्यस्त असल्याचे त्याने सांगितले. नासाबद्दल देशातील मुलांना माहिती व्हावी आणि तरूणांना देखील या क्षेत्राबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी अक्षत मोहिते यांने डिसेंबरमध्ये ठाण्यात एका परिषदेचे आयोजन केले असल्याचे यावेळी सांगितले. या सेमिनारमध्ये नासाचे शास्त्रज्ञ डॉ. रवि मार्गश्यम् आणि स्वतः अक्षत देखील मार्गदर्शन करणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading