जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्रुशोक

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काल मात्रुशोक झाला. एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांचे काल रात्री निधन झाले.
एकनाथ
शिंदे हे डहाणु येथे प्रचारात होते. त्यावेळी त्यांना आईच्या निधनाचे वृत्त समजले. त्यानंतर ते तातडीने ठाण्याला आले.
आजारपणामुळे त्या १०
दिवसांपासून ठाण्याच्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. या उपचारादरम्यान काल रात्री ११ वाजता त्यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पती संभाजी शिंदे,
पुत्र एकनाथ शिंदे, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे, एक मुलगी, सून लता शिंदे, अन्य दोन सुना, नातू विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातवंडे असा
परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज वागळे इस्टेट स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध
क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading