ठाण्यात कारमध्ये 19 लाखांची रोकड हस्तगत

ठाण्यात कारमध्ये 19 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात निवडणुक विभागाच्या दक्षता पथकाने एका
कारमधून तब्बल 19 लाखांची रोकड हस्तगत केली आहे.काल सायंकाळी सॅन्डोज बाग,लोढा इमारतीनजीक कोलशेत रोड येथे तपासणीदरम्यान
थांबवलेल्या एका खाजगी कंपनीच्या कारमध्ये पाचशे रुपयांची तीन बंडले अशी 19 लाखांची रोकड कारमध्ये आढळली. कारचालक दुर्गेश
नाडकर्णी यांना या रोकडबाबत समाधानकारक खुलासा न करता आल्याने ही रोकड जप्त करून कापुरबावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली
आहे.ही कार मृत्युंजयी कंपनीची असल्याची माहिती सहा.निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading