जिल्हा शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभागाची परिस्थिती गंभीर

जिल्हा शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभाग धोकादायक बनला असून तिथे मोठी जिवितहानी होण्याची भीती अमलगस फॅसिलिटी सर्व्हीस सेंटरचे अक्षय कोळी यांनी निदर्शनास आणली आहे. कोळी यांच्या संस्थेच्या माध्यमातून सिव्हील रूग्णालयात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. जिल्हा शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभागात अतिदक्षता विभाग फलक लिहिलेल्या ठिकाणीच विजेच्या डीपी उघड्या आहेत. त्याच्या अवतीभोवती लटकलेल्या विद्युत तारांना एखाद्या रूग्णाचा हात लागल्यास जिवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही तर अतिदक्षता विभागातील इमारतीच्या आजूबाजूच्या खिडक्यांमध्येही विद्युत तारा लटकताना दिसत आहेत. या विद्युत तारांना एखादा रूग्ण किंवा रूग्णालयात वावरणा-या मुलांचा हात लागल्यास गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतो. खिडक्यांच्या बाहेर आणि बाकड्यांच्या आजूबाजूलाही घाण, कचरा पडलेला दिसत आहे. एकीकडे या रूग्णालयाचं सुपर स्पेशालिटी रूग्णालयात रूपांतर करण्याच्या वल्गना होत असताना रूग्णालयातील परिस्थिती मात्र गंभीर असल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading