शासकीय कामकाजामध्ये आर्थिक शिस्तीचं पालन करणं आवश्यक – जिल्हाधिकारी

शासकीय कामकाजामध्ये वित्त विषयक सर्व बाबी गांभिर्यानं हातळण्याबरोबरच त्यांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देण्यात यावा तसंच या बाबी हाताळताना आर्थिक शिस्तीचं पालन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं. नियोजन भवनामध्ये सहसंचालक, लेखा आणि कोषागर विभागात यांच्या वतीनं आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. शासकीय कामकाज करताना वित्त विषयाबाबत सर्वजण अतिशय जागरूक असतात. तरी कालमर्यादा किंवा अन्य काही बाबींमुळे संक्षिप्त देयकं आणि उपयोगिता प्रमाणपत्रांचा वेळेत निपटारा होत नाही. सर्व आहरण आणि संवितरण अधिका-यांनी प्रलंबित संक्षिप्त देयकांचा आणि उपयोगिता प्रमाणपत्रांचा वेळेत निपटारा होत नाही. तो वेळेत निपटारा करणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. एखाद्या ठिकाणी बदली झाल्यानंतर उद्या परत बदली होणार आहे हा दृष्टीकोन ठेवून काम केलं तर सर्व देयकांचा वेळेत आणि जलदगतीनं निपटारा करणं सहज शक्य असल्याचं वरिष्ठ उप महालेखापाल एस. एस. सरफरे यांनी सांगितलं. विहित मुदतीत तपशीलवार देयकं सादर करण्याचा दृष्टीकोन प्रत्येकानं ठेवला तर कुठलीच देयकं प्रलंबित राहणार नाहीत असंही सरफरे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading