जिल्हा शासकीय रूग्णालयाची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू

जिल्हा शासकीय रूग्णालय हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मात्र साधारणत: १०० वर्षापूर्वी उभारण्यात आलेलं हे जिल्हा शासकीय रूग्णालय आताच्या लोकसंख्येस अपुरं पडत आहे. जिल्ह्याच्या अगदी ग्रामीण आणि दुर्गम भागातून रूग्ण या रूग्णालयात येत असतात. त्या दृष्टीनं हे रूग्णालय कमी पडत होते. म्हणून गेली अनेक वर्ष जिल्हा शासकीय रूग्णालयाचं सुपर स्पेशालिटी रूग्णालयात रूपांतर केलं जाणार असल्याची चर्चा होती. तत्कालीन पालकमंत्री आणि आता मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी यासाठी बराच पाठपुरावा केला होता. त्यांच्याच काळात या रूग्णालयासाठी वाढीव निधीही देण्यात आला होता. गेली अनेक वर्ष चर्चा असलेल्या सुपर स्पेशालिटी रूग्णालयाची आता खरोखरच उभारणी होईल असं दिसत आहे. कारण कालपासून जिल्हा शासकीय रूग्णालयाची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळं लवकरच जिल्ह्यातील रूग्णांना एक अत्याधुनिक रूग्णालय पहायला मिळेल असं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading