जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे हे आता “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” म्हणून ओळखले जाणार

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2007 ची सरळसेवा परीक्षा देवून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले विकास गजरे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर १ जून २०२३ पासून कार्यरत आहेत. मुळातच व्यायामाची आवड असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे हे आता “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” म्हणून ओळखले जाणार आहेत. कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित लोहपुरूष Triathlon या स्पर्धेत गजरे हे इतर 99 स्पर्धकांसह मोठ्या जिद्दीने उतरले होते. ही स्पर्धा तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरच्या प्रसिध्द राजाराम तलावात १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेचच कोल्हापूर-बॅंगलोर महामार्गावर ९० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ३.२१ किलोमीटर (अर्ध मॅरेथॉन) पूर्ण करणे, अशी ही स्पर्धा होणार होती. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निर्धारीत वेळ १० तास इतकी होती. ही स्पर्धा गजरे यांनी ८ तास २५ मिनिटात यशस्वीपणे पूर्ण केली अन् पटकाविला “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” किताब.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading