जिल्हा परिषदेच्या वाहन चालकाचा मुलगा एलएलबी उत्तीर्ण झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलं सन्मानित

जिल्हा परिषदेच्या एका वाहन चालकाचा मुलगा एलएलबी उत्तीर्ण झाल्यामुळे त्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अनिल शिंदे वाहन चालक म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा सागर शिंदे हा एलएलबी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे जिंदल यांच्या हस्ते त्याला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. वाहन चालक असूनही मुलांना शिकवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी अनिल शिंदे यांचं कौतुक केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading