लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी २५ कोटींचा निधी मंजूर – लवकरच होणार कामाला सुरूवात

शासनानं २५ कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे शहरामध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालय उभं राहणार आहे. मागच्या वर्षी ६ फेब्रुवारीला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं. लता मंगेशकर या २०२१ मध्ये ठाण्यात आल्या असताना त्यांनी उत्कृष्ट गायकांना चालना देण्यासाठी देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी संगीत विद्यालयं असावीत अशी इच्छा व्यक्त केली होती. लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या माध्यमातून लतादीदींना श्रध्दांजली अर्पण करावी यासाठी वर्तकनगर येथील रेप्टाकोस ब्रेट या कंपनीच्या सुविधा भूखंडावर असं संगीत विद्यालय उभारावं अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. यासाठी निधी मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावाही केला होता. शासनानं यासाठी निधी मंजूर केला असून लवकरच महापालिकेच्या माध्यमातून या कामाला सुरूवात केली जाईल असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. हे लता मंगेशकर संगीत विद्यालय राज्य शासनाच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न केलं जाणार असल्यामुळं याचा फायदा शहरातील उदयोन्मुख गायकांना होईल. तसंच या माध्यमातून नवीन संगीतकार निर्माण होतील असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading