जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समिती सभापती, समाजकल्याण समिती सभापती आणि विषय समिती सभापती पदासाठी बिनविरोध निवड

जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समिती सभापती, समाजकल्याण समिती सभापती, आणि एक विषय समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजकल्याण समिती सभापती पदी प्रकाश तेलीवरे, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर आणि विषय समिती सभापती पदी वंदना भांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. समाजकल्याण समिती सभापती पदी निवड झालेले प्रकाश तेलीवरे हे भिवंडी तालुक्यातील कांबे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तर महिला आणि बाल कल्याण समिती सभापती निवड झालेल्या श्रेया गायकर या भिवंडी तालुक्यातील पडघा गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर विषय समिती सभापती पदी निवड झालेल्या वंदना भांडे या शहापूर तालुक्यातील गोठेघर गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading