तब्बल १० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर वारक-यांना मिळाले हक्काचे वारकरी भवन

ठाण्यातील वारकरी भवनाचं अखेर १० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज लोकार्पण करण्यात आलं. ठाण्यामध्ये वारकरी भवन असावं अशी तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची इच्छा होती. नगरसेवक असताना राजन विचारे यांनी पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून संत गजानन महाराज चौक येथे वारकरी भवनाच्या इमारतीची निर्मिती केली. या वारकरी भवनाचं भूमिपूजन २००७ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यानंतर तयार झालेल्या इमारतीचे लोकार्पण 19 डिसेंबर 2011 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते परंतु शहर विकास विभागाकडे ताबा न मिळाल्याने ही इमारत तयार होऊन धूळ खात पडली होती. या वारकरी भवनातील पहिला मजला ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे दुसरा मजला संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ ठाणे आणि तिसरा मजला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा या संस्थांना देण्यात आला होता. मात्र 2017 मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारती धोकादायक झाल्याने न्यायालयीन कामकाजासाठी महापालिकेने वारकरी भवनाची इमारत ६ ते ८ महिन्याच्या मुदतीवर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाला दिली होती. वारकरी भवनाच्या इमारतीतील पहिला मजल्यावर न्यायालयीन दस्तावेज ठेवल्याने पहिला मजल्याचा ताबा मिळेपर्यंत तळमजला आणि तिसरा मजला ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ दुसरा मजला ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांना तात्पुरत्या स्वरूपात गडकरी रंगायतन येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वारकरी भवनाचं लोकार्पण करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading