जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयमार्फत ग्रंथोत्सवाचं आयोजन

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी आणि ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत तसेच प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने 19 आणि 20 नोव्हेंबरला ग्रंथोत्सव 2022 आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयमार्फत हा ग्रंथोत्सव होणार आहे. या संदर्भात नियोजनासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. ठाणे ग्रंथोत्सव-2022 च्या दोन दिवसीय कार्यक्रमात ग्रंथदिंडी, , ग्रंथप्रदर्शन,परिसंवाद,कथाकथन, काव्यसंमेलन, ठाणे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा सत्कार हे उपक्रम होणार आहे. ठाणे ग्रंथोत्सव -2022 साठी व्याख्याते, साहित्यिक, कवियत्री, लेखक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी पाटील यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading