मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहिणीच्या दृष्टीनं त्यांची भाऊबीजही आगळीवेगळी ठरली. एकनाथ शिंदे यांच्या भगिनी वर्तकनगरमध्ये राहतात. यंदा भाऊ मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या भगिनी सुनिता साळुंखे यांच्या दृष्टीनं ही भाऊबीज आगळी वेगळी ठरली. कामाच्या व्यापातही मुख्यमंत्र्यांनी वेळ काढून आपल्या बहिणीच्या वर्तकनगर येथील घरी जाऊन ही भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांच्या भगिनी सुनिता साळुंखे यांनी त्यांचं औक्षण करत ही भाऊबीज जल्लोषात साजरी केली.