घरोघरी दिवाळी पाडवा उत्साहात साजरा

सुगंधी उटणं लावून अभ्यंगस्नान आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात देवदर्शन आणि फराळावर ताव मारत घरोघरी दिवाळी पाडवा साजरा झाला. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे दिवाळी जल्लोषात साजरी झाली. कोणतेही निर्बंध आणि नियम न पाळता सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी होत होती. घरचा पाडवा साजरा केल्यानंतर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं देवदर्शनाला जातात. कौपिनेश्वर मंदिर, सिध्दीविनायक मंदिर, विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर, चरईतील बाळ गणपती मंदिर अशा अनेक मंदिरांमध्ये लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रामुख्यानं तरूण-तरूणींचा यात समावेश होता. देवदर्शन आटोपल्यावर अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात जाऊन फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद लुटला. गुजराती संवत २०७८ आणि महावीर जैन संवत २५४७ चा प्रारंभ झाल्यानं गुजराती व्यापारी आणि नागरिकांनी सकाळीच पूजा-अर्चा करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. गुजराती व्यापा-यांनी अगदी सकाळपासूनच आपली दुकानं उघडली होती. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. विक्रम संवत् साधारण नाम संवत् २०७९ चा प्रारंभ या दिवसापासून झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading