जामिनावर मुक्त झालेल्या अजय जया यांनी महापालिका आणि पोलीसांवर केले थेट आरोप

ठाण्यातील ‘प्रशांत कॉर्नर’ कारवाई प्रकरणी अटक होऊन जामीनावर मुक्तता झालेल्या अजय जया यांनी ठाणे महानगर पालिकेवर आणि पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. गुरुवारी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत, खा. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीबद्दल आदर असल्याचे स्पष्ट करून राजन राजे यांनी ‘प्रशांत कॉर्नर’ या दुकानात जर खासदाराच्या पत्नी गेल्याच नव्हत्या. तर दुकानातील तसेच आजुबाजुचे सीसी टिव्ही फुटेज जारी करावेत अथवा पोलिसांनी त्या दिवशीचे मोबाईल सीडीआर तपासावेत.अशी मागणी केली.तर, अजय जया यांनीही पोलिसांच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त करून या आधी अनेकदा ठाणे महापालिकाकेचाच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे मांडल्यानंतर पालिकेची अथवा अधिकान्यांची बदनामी झाली नाही. आणि २५ मे रोजीच्या प्रशांत कॉर्नरवरील कारवाईबाबत प्रश्न विचारल्याने थेट गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading